जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार, नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार, नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

जालना – जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून काँग्रेसच्या नगरसेविका आणि अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका सध्या संजय देठे, आशीष चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदार संघात आतापासून ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी आपली राजकीय खेळी करत विरोधी पक्ष असणा-या काँग्रेसमध्येच खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे भाजपची ताकद सध्या वाढत असल्याचं दिसत आहे. दानवेंच्या या खेळीला जालन्यात काँग्रेस कशापद्धतीनं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

COMMENTS