आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न, गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा!

आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न, गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा!

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
खळबळजनक दावा केला आहे. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. ‘लोकमत’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले. यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून तातडीने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS