हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

औरंगाबाद –  औरंगबादमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर्षीचं बजेट हे देशातील सगळ्यात वाईट बजेट असून ट्रिपल तलाक बंद झालाच पाहिजे, मात्र नवऱ्याला जेलमध्ये टाकणं चूक असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच संसदेमध्ये 50 टक्के आरक्षण कधी देणार महिलांना हा माझा प्रश्न असून  सिंदखेड राजासाठी 350 कोटी या सरकारने जाहीर केले मात्र अजूनही 3.50 कोटीही मिळाले नाही, शिव स्मारकाबाबतही तेच झालं आहे. या सगळ्या स्मारकासाठी मी एक दवस मौनव्रत पाळत आंदोलन करणार असल्याचंही त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमच्या आंदोलनाचा इतका धसका घेतला की आम्हाला सभेसाठी परवानगी सुद्धा देत नव्हते, पोलिसांनी परवानगी नाकारली तर तिथेच आम्ही सभा घेणार होतो, मात्र नंतर दिली असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यानी केलं आहे. किती दाबणार आम्ही दाबणारे नाहीत हे लक्षात घ्या,  कर्जमाफीची घोषणा केली, महाराजांचं नाव दिलं योजनेला मिळालं काय,  एक रुपया अजून मिळाला नाही,  या सरकारने फक्त फसवलं असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 

COMMENTS