भाजपवर ही वेळ का आली ?, “या” राज्यात सर्व विद्यमान खासदारांची तिकीटे कापणार !

भाजपवर ही वेळ का आली ?, “या” राज्यात सर्व विद्यमान खासदारांची तिकीटे कापणार !

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष उमेदवार निश्चित करण्यात दंग आहेत. भाजपनंही अनेक ठिकाणी सर्व्हे करुन उमेदवार निश्चित करण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी काही विद्यमान खासदारांना डच्चू दिला जात आहे. एक राज्य मात्र असं आहे ज्या ठिकाणी सर्व विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. ते राज्य म्हणज्ये छत्तिसगड. या राज्यात भाजपचे 11 खासदार आहेत. त्या सर्व 11 खासदारांना तिकीट नाकारलं जाणार आहे. पक्षातर्फे हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि छत्तिसगडचे प्रभारी अनिल जैन यांनी काल रात्री भाजप छत्तिसगडमधील सर्व खासदारांचे तिकीट कापणार असल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सर्व खासदारांची तिकीटे कापण्याच्या निर्णयाला हिरवा कंदिल दिल्याचंही जैन यांनी स्पष्ट केलं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये छत्तिसगडमध्ये भाजपला दारुण पराभव स्विकारावा लागाला होता. छत्तिसगड सरकारविरोधात असलेली अन्टीइन्कबन्सी आणि पुन्हा त्याच आमदारांना तिकीट दिल्यामुळे पक्षाचा पराभव झाल्याचं बोललं जातंय.

त्या पराभवातून धडा घेत आता भाजपनं सर्व 11 खासदारांचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये तिथले सर्व खासदार पुन्हा निवडूण येऊ शकत नाहीत असं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता तिकीटे बदलल्यामुळे त्याचा भाजपला किती फायदा होतो ते निकालानंतर स्पष्ट होईलच. मात्र यामुळे राज्यात आणि इतर ठिकाणी भाजप विरोधात विपरित संदेश जाऊ शकते हेही खरं आहे.

COMMENTS