काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावे !

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावे !

दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील ७ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, यवतमाळ वाशिममधून माणिकराव ठाकरे, वर्ध्यातून चारुलता टोकस, धुळ्यातून कुणाल पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर,  नंदुरबारमधून के सी पाडवी, शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाचा समावेश आहे.
               दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी मिळते की भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. शेवटी पक्षानं एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संधी दिली आहे. यवमाळ वाशिममधून अपेक्षेप्रमाणे माणिकराव ठाकरे, वर्ध्यातून चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळाली आहे. धुळ्यातून रोहिसाद पाटील आणि डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अनपेक्षीतप्रमाणे कुणाल पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून निलेश राणेंच्या उमेदवारीला पाठिंबा देणार का असा प्रश्न उपस्तित केला जात होता. मात्र काँग्रेसनं उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. नंदूरबार आणि शिर्डीतून अपेक्षेप्रमाणे उमेदवार जाहीर झाले आहेत.

COMMENTS