सत्तेत असूनही कामं होत नाहीत, भाजप नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

सत्तेत असूनही कामं होत नाहीत, भाजप नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

पुणे – सत्तेत असूनही नागरिकांची कामे होत नसल्याची तक्रार पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी कमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी काही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली आहे.  सत्तेत असून देखील कामे होत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचं या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे.

दरम्यान नगरसेवकांच्या या तक्रारीनंतर दोन दिवसात प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी झाला. या दीड वर्षांच्या कालावधीत भाजपाविरोधात प्रशासनामध्ये अनेक वेळा वाद झाल्याचे प्रकार घडले आहे. या संपूर्ण कालावधीत शहरात कोणतेही प्रकल्प पूर्णत्वाकडे गेलेले दिसत नाही. तर कोणत्याही कामाबाबत प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार या नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या तक्रारींची दखल मुख्यमंत्री घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS