राज्यात जलयुक्तच्या कामात मोठा भ्रष्टाचार, 14 हजार गावांमधील पाण्याची पातळी घटली – काँग्रेस

राज्यात जलयुक्तच्या कामात मोठा भ्रष्टाचार, 14 हजार गावांमधील पाण्याची पातळी घटली – काँग्रेस

मुंबई – राज्यात जलयुक्त शिवाराची कामं झाली असली तरी राज्यातील 14 हजार गावातील विहिरीतील पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा जास्तने घटली असल्याचा सरकारचा अहवाल सांगतो. हा अहवाल समोर आणून काँग्रेसने राज्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या दुष्काळमुक्तीच्या दाव्याबाबतही सवाल उपस्थित केला आहे. राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांसाठी साडे सात हजार कोटी खर्च झाला आहे, त्यातून 5 लाख 41 हजार कामं झालेली आहेत. तरीही राज्यातील 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यातील 13984 गावातील भूजल पातळीत 1 मीटरपेक्षा घट झाली असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल सांगतो. याचाच अर्थ जलयुक्तच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील पाणी पातळीशी मागील पाच वर्षातील याच महिन्यातील पाणी पातळीशी तुलना करून समोर आलेली माहिती राज्यातील दुष्काळाची तीव्रता दर्शवित असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

 काय सांगतो ?

पाणीपुरवठा विभागाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल 2018-19

– राज्यातील 13984 गावातील विहिरींमधील पाणी पातळीत 1 मीटरपेक्षा जास्त घट

– यातील 3343 गावातील विहिरीतील पाणी पातळीत 3 मीटरपेक्षाही जास्त घट

– 3430 गावातील विहिरींमधील पाणी पातळीत 2 ते 3 मीटर घट

– तर 7212 गावातील विहीरीतील पाणी पातळीत 1 ते 2 मीटरने घट झाली आहे.

COMMENTS