मी त्यांच्यावर प्रेम केलंय, अशी सोडणार नाही, आमदाराच्या घरात प्रेयसीचा राडा !

मी त्यांच्यावर प्रेम केलंय, अशी सोडणार नाही, आमदाराच्या घरात प्रेयसीचा राडा !

नवी दिल्ली – एका आमदाराच्या घरात प्रेयसीनं राडा घातला असल्याची माहिती आहे. मी त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना अशी सोडणार नाही असं म्हणत या महिलेनं कर्नाटकातील भाजप आमदार एस. ए. रामदास यांच्या कार्यालयात राडा केला आहे. प्रेमकुमारी असं या महिलेचं नाव असून गुरुवारी सकाळी तिने कर्मचा-यांच्या समोर राडा केला आहे. या महिलेच्या या राड्याची सध्या कर्नाटकच नाही तर देशभरात चर्चा रंगली असल्याचं पहावयास मिळत आहे.

काय आहे प्रकरण

दरम्यान रामदास हे मैसूरच्या कृष्णाराजा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. ते घरातूनच कार्यालयीन कामकाज पाहतात. रामदास यांच्या घरातच असलेल्या कार्यालयात या महिलेनं राडा केला असल्याची माहिती आहे. झालं असं की गुरुवारी सकाळी ही महिला रामदास यांच्या कार्यालयात पोहचली. यावेळी रामदास हे कार्यालयात नव्हते. त्यावेळी तिने त्यांच्याबद्दल विचारणा केली. ‘ते माझे पती आहेत. त्यांना भेटायचं आहे, असं तिनं सांगितलं. मात्र, आमदार कार्यालयात नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगताच तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला.’माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी रामदास यांना सोडणार नाही. मी एका चांगल्या घरातील बाई आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. या प्रेमाखातरच मी त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली होती. कित्येक दिवसांपासून त्यांना भेटायचा प्रयत्न करत आहे. परंतु ते माझा फोनही उचलत नाहीत आणि भेटतही नाहीत असं या महिलेनं म्हटलं आहे.

 आरोप फेटाळले

रामदास यांच्या निकटवर्तीयांनी प्रेमुकमारीचे आरोप फेटाळले आहेत. पैसे मिळवण्यासाठी ती आमदारांना ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मागील निवडणुकीत प्रेमकुमारी आणि रामदास हे आमनेसामने होते. परंतु निवडणुकीपूर्वीच तिने उमेदवारी मागे घेतली होती. तसेच पाच कोटी देऊन तिला माघार घ्यायला लावल्याचा आरोपही त्यावेळी रामदास यांच्यावर करण्यात आले होते.

 

COMMENTS