लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसला असून काही दिवसांपूर्वीच भाजपमधून बाहेर पडलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे.

दरम्यान गेली अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले यांनी भाजपवर जोरदार आरोप केले होते. भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप करत राम मंदिर आणि दलितांवरील हल्ल्यांवरुन सावित्रीबाई फुलेंनी भाजपाला अनेकदा लक्ष्य केलं होतं. भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्येत 1992 सारखी परिस्थिती निर्माण करत आहे. समाजात फूट पाडून तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळेच पक्ष सोडत असल्याचं फुले म्हणाल्या होत्या. डिसेंबरमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काल अखेर त्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.

COMMENTS