नगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि राहणार – अजित पवार

नगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि राहणार – अजित पवार

पुणे – नगर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु असल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ही जागा काँग्रेसला सोडली असल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं म्हटलं होतं. या जागेबाबत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. नगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि राष्ट्रवादीचीच राहील, तसेच नगरची जागा सोडल्याचं पवार साहेबांनी कुठेही सांगितलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत हते.

दरम्यान राज्यसभेत न पाठवता वंदनाताईंनी पुण्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व करावं अशी माझी इच्छा होती , पण जर तरला उपयोग नसतो असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आघाडीचे जागावाटप ८ मार्चपर्यंत होणार असून राजू शेट्टींबरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही त्यांना २ जागा द्यायला तयार आहोत असं स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिलं आहे.

COMMENTS