‘या’ मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या, बंडखोर उमेदवारांचे अर्ज कायम!

‘या’ मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या, बंडखोर उमेदवारांचे अर्ज कायम!

मुंबई – काही मतदारसंघामध्ये बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि शिर्डी मतदारसंघात भाजपला फटका बसणार असल्याचं दिसत आहे. धुळ्यात भाजप आ. अनिल गोटे यांनी, नंदुरबारमध्ये डॉ. सुहास नटावदकर, शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकमध्ये भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान शिर्डीत भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सदाशिव लोखंडे (शिवसेना) व वाकचौरे (अपक्ष) असा सामना होत आहे. तर नंदुरबारमध्ये भाजपचे डॉ. सुहास नटावदकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या खा. हीना गावित यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.

तसेच धुळ्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. गोटेंच्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांची अडचण झाली आहे. तर नाशिकमध्ये भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी आहे. शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे रिंगणात असून, त्यांना बंडखोरीचा फटका त्यांना बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS