सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट,  राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. सोलापूरमध्ये तिहेरी लढत पहावयास म्ळत असून या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे.

दरम्यान निवडणुकीपूर्वीच शिंदे यांनी कट्टर प्रतिस्पर्ध्याची भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु  ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली आहे.

COMMENTS