मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असल्याचं समोर आलं आहे. भाजप मुंबई येथील कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. निवडणूक प्रचार समितीच्या बैठकदरम्यान हा प्रकार घडला आहे.  अहमदनगरचे विद्यमान खादार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केली असून दिलीप गांधी यांनाच पुन्हा तिकीट देण्याची मागणी त्यांनी केली आहे. संभाव्य उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या नावाला या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्चला दादरमधील वसंत स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. पण आता अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान भाजपची निवडणूक प्रचार समितीच्या बैठक दादर इथल्या कार्यालयात पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजता भाजप संसदीय समितीची बैठक असून या बैठकीनंतर राज्यातल्या भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.

COMMENTS