माढातून राष्ट्रवादीच्या तिकीटाबाबत ट्वीस्ट!

माढातून राष्ट्रवादीच्या तिकीटाबाबत ट्वीस्ट!

पुणे – आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा विचार राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार हे करत आहेत. परंतु माढ्यातून शरद पवारांनीच निवडणूक लढवावी
असा आग्रह माढा मतदारसंघातील नेत्यांनी शरद पवारांना पुन्हा केला आहे. एकाच घराण्यातील तीन उमेदवार नको म्हणून पवारांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार असल्याची माहिती आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे, तर मावळमधून पार्थ पवार उमेदवारीसाठी अडून बसले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचं ठरवलं आहे.

मात्र शरद पवारांनीच माढ्यातून निवडणूक लढवावी यासाठी नेते आग्रही अहेत. सभापती रामराजे निंबाळकर, आमदार प्रभाकर घार्गे, दीपक चव्हाण, भारत भालके, शेकापचे गणपतराव देशमुख यांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक सुरू असून या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना पुन्हा आग्रह केला आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS