छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याचा मार्ग सूकर ?  का ? वाचा ही बातमी !

छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याचा मार्ग सूकर ?  का ? वाचा ही बातमी !

दिल्ली – सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या एका निर्णयाचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना होऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने काल मनी लॉन्ड्रींग प्रकरणातील कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या कलमामुळे आरोपीला खूप काळ कोठडीत रहावं लागत असे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या कलम 45 घटनाबाह्य ठरवण्याचा निर्णयामुळे छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींवर मनीलॉन्ड्रींगचे आरोप आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारला मात्र या निर्णयचा चांगलाच दणका बसला आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या कलमाचा फायदा होतो असा केंद्र सरकारचा कयास होता. या प्रकरणात ज्यांना जामीन मिळाला नाही. त्यांना जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेचं याबाबत लवकर सुनावणी करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

कलम 45 नेमकं होतं?

कोर्टाला जेंव्हा पूर्णपणे अशी खात्री पटेल की आरोपीने गुन्हा केला नाही. तसेच पुढे तो कोणताही गुन्हा करणार नाही. याची पूर्णपणे खात्री कोर्टाला वाटली तरच आरोपीला जामीन मिळत असे.

COMMENTS