गुजरातमध्ये काँग्रेसचा बोलबाला का वाढतोय ?  काय आहेत कारणे ?  प्रचाराची बदललेली स्ट्रॅटर्जी कितपत फायद्याची ठरत आहे ? वाचा सविस्तर

गुजरातमध्ये काँग्रेसचा बोलबाला का वाढतोय ?  काय आहेत कारणे ?  प्रचाराची बदललेली स्ट्रॅटर्जी कितपत फायद्याची ठरत आहे ? वाचा सविस्तर

अहमदाबाद – यंदा पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेस विधानसभेच्या लढतीमध्ये आहे असं चित्र निर्माण झालंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंर पहिल्यांदाचं काँग्रेस जिंकण्यासाठी लढत आहे असंही वाटू लागलं आहे. विविध जातीसमुहांना काँग्रेसनं एकत्र करण्याचा प्रय़त्न केला आहेच. त्याचबरोबर काँग्रेसनं आपल्या प्रचाराच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसची काय आहे बदललेली स्ट्रॅटर्जी ?

  • भाजपच्या मातब्बर उमेदवारांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचे प्रयत्न

काँग्रेसनं यावेळी भाजपचा हा गेम प्लॅन त्यांच्यावर उलटवण्याचा प्रय़त्न केला आहे. भाजप यापूर्वी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचा प्रय़त्न करत असे. यावेळी काँग्रेसनं तीच स्ट्रॅटर्जी वापरली असल्याचं दिसून येतंय. विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या विरोधात काँग्रेसनंही तगडा उमेदवार दिला आहे. रुपानी यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी त्यांच्या राजकोट पश्चिम या मतदारसंघातून इंग्रनील राजगुरू यांना उमेदवारी दिली आहे. राजगुरू हे तगडे उमेदवार आहेत. गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. विजय रुपानी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या मतदारसंघात आपण निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा राजगुरू यांनी केली होती. त्यानुसार रुपानी यांनी या मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजगुरू यांनीही त्याच मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विजय रुपानी यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ त्यांच्या मतदारसंघात द्यावा लागणार आहे. भाजपचे आणखी एक दिग्गज नेते बाबुभाई बोखारिया यांच्याविरोधात पोरबंदर मतदारसंघातून काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया या तगड्या उमेदवारा रिंगणात उतरवंल आहे. त्यामुळे बोखरिया यांना मतदारसंघातंच पूर्णवेळ रहावे लागणार आहे. असा प्रयोग आणखी काही मतदारसंघात केला गेला आहे.

  • यंदा काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाची कास

पहिल्यांदाचं काँग्रसने गुजरातमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरल्याचं चित्र आहे. राहुल गांधी प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात विविध मंदिरांना भेट देत आहेत. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच गोध्रा हत्याकांड किंवा गुजरात दंगलीचा फारशी चर्चा काँग्रेसकडून केली जात नाही. बनावट एन्काऊंटर याचीही  चर्चा गुजरातच्या निवडणुकीत फारशी होताना दिसत नाही. या प्रकरणावरुन काँग्रेस नेहमी मोदी आणि शहा यांना टार्गेट करायची. यंदा मात्र काँग्रेसच्या प्रचाराचा रोख हा जीएसटीची फसलेली अंमलबजावणी आणि नोटबंदी यावर फोकस केला जात आहे.

  • सोशल मीडियाचा चपलख वापर

यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसकडून सोशल मीडियाचा चपलख वापर होताना दिसत आहे. सोशल मीडियाची धुरा कर्नाटकातील माजी खासदार रम्या यांच्याकडे दिल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रचाराला धार आलेली दिसत आहे. विकास पागल हो गया है  या गाण्यापासून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल करायला सुरूवता केली होती. त्यात सातत्य ठेवले आहे. तंत्रज्ञानासोबत मुद्दयांचाही योग्य वापर केला जात आहे. सोशल मीडियासाठी प्रोशनलची नवी टीम तयार करण्यात आली आहे. भाजपच्या प्रचाराला सोशल मीडियातून आक्रमकपणे प्रत्युतर दिले जात आहे.

  • सर्व जाती समुहांची मोट बांधण्याचा प्रयत्न .

आधीच्या निवडणुकीत भाजपकडून केवळ होटबँक समजल्या जाणा-या दलित मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रीत केलं जात असे. यावेळी मात्र सर्वसमाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसडून केला जात आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी, पाटीदार यांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रय़त्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे. अल्पेश ठाकूर या ओबीसी नेत्याला पक्षात प्रवेश देऊन त्यांनी केलेल्या ओबीसी संघटनाचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रय़त्न आहे. त्याचसोबत हार्दिक पटेल यांच्या माध्यमातून पाटीदारांना जवळ केलं आहे. तर जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन एक सर्वसमावेशक मोट बांधण्याचा प्रय़त्न काँग्रेसकडून केला जात आहे. बघूयात आता प्रत्यक्षात निवडणुकीत याचा किती फायदा काँग्रेसला होतो.

COMMENTS