महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी गायलं कन्नडमधून गाणं, गाण्याचे बोल ऐकूण बेळगावमधील मराठी बांधव संतापला !

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी गायलं कन्नडमधून गाणं, गाण्याचे बोल ऐकूण बेळगावमधील मराठी बांधव संतापला !

बेळगाव –  महाराष्ट्राचे महसूलमंत्री आणि सीमा प्रश्नाचे समन्वयमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमधे जावून चक्क कन्नडमधून गाणं गायलं आहे. हुट्टदरे कन्नड नाड हुट्टबेकु, मेट्टीदारे कन्नड मन्नल्ली मेट्टबेकु असे या गायलेल्या गाण्याचे बोल असून जन्माला आले तर कर्नाटकमध्ये जन्मायला यायला हवं असा या गाण्याचा मराठीत अर्थ आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी गायलेल्या या गीतामुळे सीमा भागातील मराठी बांधव चांगलाच संतापला आहे.

चंद्रकांतदादा यांनी गायलेलं हे गाणं आकस्मीका या कन्नड चित्रपटातील असून अभिनेते Dr. राजकुमार यांनी हे गाण गायलं आहे. या चित्रपटात वापरलेला ध्वज कन्नड रक्षण वेदीका आपला ध्वज म्हणून वापरते. इतकच नव्हे तर १ नोव्हेंबरला सीमा भागातील मराठी बांधव काळा दिवस पाळत आसताना त्याच दिवशी हे गाण कर्नाटकमधील उत्सवातील प्रमुख गीत म्हणून सर्वत्र वाजवलं जातं. महाराष्ट्राच्या आणि मराठी मंत्र्यानंच हे गाणं गायल्यामुळे आमच्या जखमेवर मीठ चोळलं जात असल्याचा संताप तेथिल मराठी बांधवांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS