ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती !

ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती !

नवी दिल्ली – ओम प्रकाश रावत यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 23 जानेवारीला ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.  ए के ज्योती यांच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ओम प्रकाश रावत यांची आतापर्यंतची कारकीर्द !

1 ) मध्य प्रदेशातील काडर येथील 1977 बॅचमधील आयएएस अधिकारी

2 )2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी रावत यांना निवडणूक आयुक्त बनवण्यात आलं होतं.

3) निवडणूक आयुक्त बनण्यापूर्वी ते केंद्रात सचिव पदावर कार्यरत होते.

4 )ओम प्रकाश रातव यांचा जन्म दोन डिसेंबर 1953 मध्ये झाला.

5 ) ओम प्रकाश रावत हे 31 डिसेंबर, 2013 मध्ये केंद्र सरकारच्या सचिव पदावरुन निवृत्त झाले होते.

 

COMMENTS