छगन भुजबळांना केईएम रुग्णालयात हलवले !

छगन भुजबळांना केईएम रुग्णालयात हलवले !

मुंबई – आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अखेर जेजे रुग्णालयातून केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जेजे हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएन्टरोलॉजीस्ट उपलब्ध नसल्याने त्यांना केईएममध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून छगन भुजबळ यांना केईएममध्ये हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात दाखल करण्यात आले आहे. आर्थर रोड जेल प्रशासन आणि मुंबई हाटकोर्टाने परवानगी दिल्यानंतर छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच त्यांना पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा देखील त्रास आहे. याबरोबर त्यांना अन्ननलिका आणि आतड्यांचा आजार असल्याचेही स्पष्ट झाले होते.

दरम्यान छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयाऐवजी दुस-या रुग्णालयात चांगले उपचार देण्याची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून छगन भुजबळांची प्रकृती खालावली तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनीच छगन भुजबळांच्या प्रकृतीबाबत दखल घेत त्यांना आता केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

COMMENTS