श्रीपाद छिंदमची कारागृहातून सुटका !

श्रीपाद छिंदमची कारागृहातून सुटका !

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने छिंदमला १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच कारागृहाबाहेर येताच छिंदम अज्ञातस्थळी रवाना झाला असल्याची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे आणि अक्षेपार्ह वक्तव्य करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणणे असे दोन गुन्हे छिंदमवर दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांत अहमदनगर सत्र न्यायालयाने छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर छिंदमला आज दुपारी कारागृहातून सोडण्यात आले असल्याची माहिती आहे.

दरम्यान श्रीपाद छिंदमनं १६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर त्याच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.त्यानंतर राज्यातील जनतेनं त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचे कार्यालयही तोडण्यात आले होते. त्याच दिवशी छिंदम विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटना छिंदमचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. वाढता जनक्षोभ पाहता पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात गेतलं होतं. तसेच भाजपनंही त्याची पक्षातून हकालपट्टी करत उपमहापौरपदावरुन हटवण्यात आलं होतं.

तसेच छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आले असल्याचं त्याने जामीन अर्जात म्हटले होते. तसेच मी घरातील एकमेव कर्ता पुरुष असून माझी आई आजारी आहे व मला दोन लहान मुले असून त्यांच्या देखभालीसाठी माझा जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याने जामीन अर्जात केली होती. त्यानंतर छिदमचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून आज दुपारी त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

COMMENTS