त्यामुळे माझ्या चेह-यावर आज डबल हसू दिसतंय, रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर!

त्यामुळे माझ्या चेह-यावर आज डबल हसू दिसतंय, रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर!

मुंबई –  लोकमत समूहाच्यावतीने घेण्यात आलेला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर‘ पुरस्कार सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतली आहे. यावेळी रितेश देशमुख यांनी
सत्तेवर आलात तेंव्हापासून शिवसेनेनं तुमच्यावर बाण चालवला आहे. हे चार वर्षांपासून चालत आलं आहे. तरीही तुम्ही पन्हा एकत्रित कसे आला असा सवाल केला. तसेच तुम इतना क्यो मुस्कुरा रहेते हो क्या गम हे ओ छुपा रहे हो असा सवाल केला. यावर मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना विरोधकांना टोला लगावला आहे.

जो बीत गया ओ बीत गया, आम्हाला एकमेकांसोबत रहायची सवय आहे, आम्ही जन्मभर एकमेकांसोबत राहिलोत आणि राहणार आहोत परंतु ज्यांनी एकमेकांचं कधी तोंडही पाहिलं नाही त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले आहेत. त्यामुळे माझ्या चेह-यावर डबल हसू दिसत आहे, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

COMMENTS