काँग्रेसच्या माजी मंत्र्याला भाजपकडून ऑफर, आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

काँग्रेसच्या माजी मंत्र्याला भाजपकडून ऑफर, आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

पालघर  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या माजी मंत्र्याला भाजपनं ऑफर दिली आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याची शक्यता आहे. राजेंद्र गावित हे काँग्रेसचे नेते असून, आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री होते. पालघर पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र गावित यांना आयात करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती आहे. तसेच आज संध्याकाळी राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर भाजपने हालचाली वाढवल्या आहेत. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. आता फक्त शिंगडा यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे राजेंद्र गावित हे नाराज आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS