2019 मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो – राहुल गांधी

2019 मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो – राहुल गांधी

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमधील नेत्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. आज राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली असून यादरम्यान त्यांनी पंतप्रधानपदाबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं असून 2019 मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. परंतु अशातच राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकीत जिंकून आलो तर पंतप्रधान बनू शकतो असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

 

COMMENTS