…तर सरकारने धनगर आरक्षणचा प्रस्ताव मांडावा, विरोधी पक्ष पाठिंबा देईल – धनंजय मुंडे

…तर सरकारने धनगर आरक्षणचा प्रस्ताव मांडावा, विरोधी पक्ष पाठिंबा देईल – धनंजय मुंडे

मुंबई – धनगर आरक्षणच्या विषयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, धनगर समाजाचे नेते आणि आमदार यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत धनगर आरक्षणबाबत प्रस्ताव विधानपरिषदमध्ये मांडून एकमताने मंजूर करावा अशी मागणी वयधनंजय मुंडे यांनी केली. परंतु याबाबत विरोधी पक्षाने प्रस्ताव मांडू नये अशी भूमिका घेण्यात आली. परंतु प्रतिष्ठेचा मुद्दा असेल तर सरकारने धनगर आरक्षणचा प्रस्ताव मांडावा, विरोधी पक्ष पाठींबा देईल असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दम्यान धनगर आरक्षण कधी देणार या विषयावरून विधानपरिषदेत आज विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, धनगर समाजाचे नेते आणि आमदार यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत धनगर आरक्षणबाबत प्रस्ताव विधानपरिषदमध्ये मांडून एकमताने मंजूर करावा अशी मागणी वयधनंजय मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS