मराठा क्रांती मोर्चाचं सरकारला गाजरं दाखवत आंदोलन !

मराठा क्रांती मोर्चाचं सरकारला गाजरं दाखवत आंदोलन !

मुंबई – राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन एकही पूर्ण न झाल्याने येणा-या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाने केलाय. राज्य सरकारने मराठा समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं मुंबईत सरकारला गाजरे दाखवत आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान राज्यभरात ६० मोर्चे काढल्यानंतर सरकारने मोठ्या थाटात आरक्षण दिल्याची घोषणा केली, आता हे आरक्षण हायकोर्टात टिकते की नाही याची पूर्ण जबाबदारी सरकारची राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या मागणीबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, शिव स्मारकाचे कामही थांबवले गेलंय तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी कर्जपुरवठाही होत नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने सांगितले.

COMMENTS