बाबुजींच्या मार्गदर्शनाची आज सर्वाधिक गरज होती, धनंजय मुंडेंची लोहिया यांना श्रध्दांजली !

बाबुजींच्या मार्गदर्शनाची आज सर्वाधिक गरज होती, धनंजय मुंडेंची लोहिया यांना श्रध्दांजली !

बीड, अंबाजोगाई – मानवलोकचे संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ.द्वारकादास लोहिया उर्फ बाबुजी यांनी 1972 च्या दुष्काळात मोठं काम केले होते. आज 1972 पेक्षाही गंभीर दुष्काळाची परिस्थिती असल्याने बाबुजींच्या मार्गदर्शनाची खरी गरज होती. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक मोठी व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

बाबुजींच्या प्रकृतीची दोन दिवसांपुर्वीच आपण चौकशी केली तेव्हा ते इतक्यात आपल्याला सोडुन जातील असे वाटले नव्हते. मानवलोक संस्थेच्या माध्यमातुन साडेचार दशके विविध सामाजिक उपक्रम राबवणारे ते संघर्ष यात्री होते. आपली शेवटची भेट झाली तेव्हा ते सर्वाधिक शेती, शेतकरी आणि दुष्काळ निवारणाच्या कामा विषयी बोलत होते. त्यातुन त्यांचे शेतकरी, जनते विषयीची तळमळ लक्षात येते. त्यांच्या विचारांची आणि कामाची मशाल मानवलोकच्या विविधि कार्यातुन कायम तेवत ठेवणे हिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे ही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS