मंत्रीपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथ खडसेंची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया!

मंत्रीपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथ खडसेंची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया!

मुंबई – राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. या विस्तारात भाजपच्या 10, शिवसेनेच्या 2 तर रिपाइंच्या एका नेत्यानं मंत्रीपदाची शपथ घेतली.या मंत्रीमंडळ विस्तारात सुरुवातीलाच पक्षात एन्ट्री मारलेल्या नेत्यांना थेट मंत्रिपद मिळाले आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपचे नेते आणि मंत्रीपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथ खडसेंनी खदखद व्यक्त केली आहे.मंत्रीमंडळात जायला मला आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु केले आहे. परंतु त्याच वेळेला पक्षातील जुन्या नेत्यांना डावलले आहे. आमच्या पक्षात असे अनेक नेते आहेत जे चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांचे दुःख सहाजिक असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान आजच्या मंत्रिमडळ विस्तारात मुंबईतून आशिष शेलार (भाजप), योगेश सागर (भाजप), अविनाश महातेकर (रिपाइं) यांनी शपथ घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे (भाजप), बाळा भेगडे (भाजप) यांनी शपथ घेतली.

मराठवाड्यातून अतुल सावे (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) यांनी शपथ घेतली.

उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांनी शपथ घेतली.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातून तानाजी सावंत (शिवसेना) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

विदर्भातून अनिल बोंडे (भाजप), परिणय फुके (भाजप), संजय कुटे (भाजप), अशोक उईके (भाजप) यांनी शपथ घेतली.

COMMENTS