विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या 80 उमेदवारांची नावे निश्चित ?

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या 80 उमेदवारांची नावे निश्चित ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जोरदार तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. निवडणुकीला अजून बराच अवधी असतानाच राष्टेरवादीच्या जवळपास 80 उमेवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उमेदवारांची नावे येत्या पंधरा दिवसात निश्चित करण्यात येणार असून याबाबत त्यांना माहिती कळविण्यात येणार आहे. तसेच या उमेदवारांना संकेत मिळाले असून ते निलडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील सर्वाधिक उमेदवारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते तसेच तरुण चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच निवडून येण्याचा निकष लक्षात घेण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर संबंधित उमेदवार बंडखोरी करत दुसऱ्या पक्षातून लढणार नाहीत, अशा उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्यानुसार राज्यभरातील ८० विधानसभांचे उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती आहे.  या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास रोहित पवार इच्छूक आहेत. यापूर्वीही त्यांनी विधानसभा लढविण्याची तयारी दर्शविली होती. परंतु या मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी रोहीत पवार यांच्या उमेदवारीला नयविरोध दर्शवला आहे. त्यामुळे याबाबतही शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS