गोवा – माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांचं निधन !

गोवा – माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांचं निधन !

पणजी – गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे आमदार अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज निधन झालं आहे. ते 63 वर्षाचे होते. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं असून गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगावरील उपचारासाठी न्यूयॉर्कला नेण्यात आले  होते. फ्रांसिस डिसोझा यांच्या मृत्यूमुळे भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक चेहरा गमावला आहे.

दरम्यान फ्रांसिस डिसोझा हे गेली 25 वर्षांपासून म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. गेली वीस वर्षे ते भाजपशी एकनिष्ठ राहिले. परंतु ते विदेशात उचारासाठी गेले असताना त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विश्‍वासू म्हणून ते गणले जात. भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपची विचारसरणी पूर्णपणे अंगीकारली होती. त्यातूनच ख्रिस्ती हिंदू वाद त्यांच्या वक्‍तव्यामुळे निर्माण झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानात राहणारा तो हिंदू अशी व्याख्या केली होती. त्यावर मत व्यक्त करताना त्या अर्थाने मी हिंदू पण मी ख्रिस्ती हिंदू असे फ्रांसिस डिसोझा यांनी म्हटले होते.

 

COMMENTS