हार्दिक पटेलचा काँग्रेसमध्ये प्रवेश, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

हार्दिक पटेलचा काँग्रेसमध्ये प्रवेश, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

अहमदाबाद – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जामनगरमधून हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीची अहमदाबाद येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये हार्दिक पटेल यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

गेली काही वर्षांपासून हार्दिक पटेल यांनी भाजपविरोधात बंड पुकारले आहेत. पाटीदार समाजाच्या आरक्षणावरुन त्यांनी सरकारविरोधात मोठं आंदोलनही केलं होतं. त्यामुळे ते देशभरात ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे याठीकाणी काँग्रेसची ताकद वाढली असून गुजरातमधील जामनगर लोकसभेच्या जागेवर सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत. हार्दिक पटेल आता या जागेवरून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS