राष्ट्रवादीची पहिली यादी, ‘या’ नऊ उमेदवारांची नावं निश्चित?

राष्ट्रवादीची पहिली यादी, ‘या’ नऊ उमेदवारांची नावं निश्चित?

मुंबई –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पहिल्या यादीत नऊ उमेदवारांची नावे निश्चेत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव असून, बारामतीतून सुप्रिया सुळे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले ही अपेक्षित पहिल्या यादीत आहेत. तसेच भंडारा-गोंदियातून वर्षा पटेल, जळगावातून गुलाबराव देवकर, तर बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS