कोल्हापूरला परत जाणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूरला परत जाणार – चंद्रकांत पाटील

पुणे- पुण्यात सेटल व्हावं अस प्रत्येकाला वाटं पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते  पुण्या अटल संस्कृती गौरव पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

मूळचे कोल्हापूर जिल्हातील असलेल्या चंद्रका्त पाटील यांनी दोन वेळा विधान परिषदेच्या पुणे पदवीधऱ मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून कोल्हापूरमधून  निवडणून येता येणार नाही म्हणून पुण्यातून निवडणूक लढली अशी टिका केली जात होती. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातून कोणत्याही मतदारसंघातील आमदाराने राजीमाना देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात मी पुन्हा कोल्हापूरला परत जाणार असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS