एकनाथ खडसेंना गृहनिर्माण खातं देणार?, नाराज असलेले जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला!

एकनाथ खडसेंना गृहनिर्माण खातं देणार?, नाराज असलेले जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे आव्हीड यांनी पवारांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. त्यामुळे आव्हाड हे याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचं बोललं जात आहे. जवळपास पवार आणि आव्हाड यांच्यात तासभर चर्चा झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आहे. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे देखील अनुत्सुक आहेत. त्यामुळे खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसेंबाबत राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पाहण दरजेचं आहे.

COMMENTS