कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसकडून मायावतींच्या ‘हत्ती’ला बक्षीस !

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसकडून मायावतींच्या ‘हत्ती’ला बक्षीस !

बंगळुरु – कर्नाटकच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच हत्तीचं म्हणजे बसपाच्या आमदारांच पाऊल पडलं आहे. कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच बसपाच्या तिकीटावर एन महेश हे निवडून आले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत बसपाचा एकच आमदार निवडून आला असतानाही काँग्रेस, जेडीएसनं त्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. उत्तर प्रदेशबाहेर कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळात बसपाला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी उत्तर प्रदेश वगळता बसपाला कोणत्याही राज्यात मंत्रीपद मिळालेलं नाही.

दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचा शपथविधी सोहळो आज संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या उपस्थितीत राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कुमारस्वामी यांचे भाऊ एच. डी. रेवाना यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेच्या चाव्या मिळू नये, यासाठी मायावतींनी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही संपर्क साधला होता. काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारण्याचा सल्ला मायावतींनी देवेगौडा यांना दिला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला कर्नाटकमध्ये सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे मायावतींच्या उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान दिलं असल्याची चर्चा आहे.

COMMENTS