समीर भुजबळांनाही जामीन मंजूर, सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर !

समीर भुजबळांनाही जामीन मंजूर, सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर !

मुंबई  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर आपल्याला जामीन द्यावा, यासाठी समीर भुजबळांनी हायकोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर समीर भुजबळ यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल सव्वा दोन वर्षानंतर समीर भुजबळ हे तुरुंगाबाहेर येणार आहेत.

दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा असून समीर भुजबळ यांनी यापूर्वीच त्यापैकी एक तृतीयांश कालावधी जेलमध्ये काढला आहे, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने समीर भुजबळ यांना फेब्रुवारी 2016 मध्ये अटक केली होती. त्यानंतर तब्बल सव्वा दोन वर्षे त्यांनी तरुंगात काढली आहेत.

COMMENTS