सरकार स्थापनेसाठी विरोधकांनी आखली ‘ही’ रणनिती !

सरकार स्थापनेसाठी विरोधकांनी आखली ‘ही’ रणनिती !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील आणखी दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांनी आतापासूनच हालचाली करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यास सर्वात मोठया पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण देऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. यासाठी विरोधी पक्षांकडून एक पत्र सादर केलं जाणार आहे. या त्रावर केंद्रात भाजपाचा विरोध करणाऱ्या २१ पक्षांची स्वाक्षरी करण्याची योजना आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वात मोठया पक्षाला प्रादेशिक पक्षांच्या आघाडीमध्ये फूट पाडण्याची संधी मिळू नये यासाठी २१ विरोधी पक्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. ५४३ सदस्यांच्या लोकसभेत २७२ हा बहुमताचा आकडा आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकट्याने २८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही तर सर्वात मोठया पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण देऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्याची योजना आखली आहे.

COMMENTS