नारायण राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबद्दलही खळबळजनक गौप्यस्फोट !

नारायण राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबद्दलही खळबळजनक गौप्यस्फोट !

मुंबई  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्रातून नारायण राणेंनी वादळी खुलासे केले आहेत.  राणेंनी आपल्या आत्मचरित्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही खळबळजन गौप्यस्फोट केले आहेत.
शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता.

आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करु, असं निमंत्रण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. मात्र, राज ठाकरेंचं निमंत्रण नारायण राणेंनी नाकारलं. “ठाकरेंची कामाची पद्धत माहित असल्यानं, सोबत काम करणार नाही.” असे नारायण राणेंनी राज ठाकरेंना कळवलं होतं असंही यामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान  राज ठाकरेंसोबत शिवसेनेतले जवळपास 38 आमदार होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे 38 आमदारही पक्ष सोडणार होते. मात्र, प्रत्यक्षात 13 आमदारांनी सोडलं, असे नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

COMMENTS