मुख्यमंत्री माझे मेहुणे, गाडी सोडण्यासाठी पोलिसाला दम ! VIDEO

मुख्यमंत्री माझे मेहुणे, गाडी सोडण्यासाठी पोलिसाला दम ! VIDEO

मध्य प्रदेश  – मुख्यमंत्री माझे मेहुणे आहेत माझी गाडी सोड असं म्हणत ट्राफिक पोलिसाला दम देण्यात आला आहे. भोपाळमध्ये ही घटना घडली असून एनआयनं याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्राफिक पोलिसांनी एकाची गाडी अडवली होती. ही गाडी अडवल्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं पोलिसांवर ओरडण्यास सुरुवात केली. तसेच सोबतच्या महिलेला चप्पल काढून यांची बघ असं या व्यक्तीनं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री माझे महुणे आहेत असं त्यानं म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली असून त्याचं असं आहे की, माझ्या कोट्यवधी बहिणी आहेत आणि मी कित्येकांचा मेहुणा आहे. कायदा आपले काम करेल असं ते म्हणाले आहेत.

 

 

 

COMMENTS