राज्यातील सहा वाईन उत्पादक कंपन्यांवर सरकार मेहरबान, 118 कोटींचा कर माफ करण्याचा प्रस्ताव !

राज्यातील सहा वाईन उत्पादक कंपन्यांवर सरकार मेहरबान, 118 कोटींचा कर माफ करण्याचा प्रस्ताव !

मुंबई – राज्यातील सहा वाईन उत्पादक कंपन्यांवर सरकार मेहरबान झालं आहे. या कंपन्यांकडे कराची 118 कोटी रुपयांची थकबाकी असून ती माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला असल्याची माहिती आहे. तसेच राज्य सरकारनं जर हा प्रस्ताव मंजूर केला तर  इतिहासात पहिल्यांदाच वाईनवरील कर माफ केला जाणार आहे. राज्य आर्थिंक संकटात असताना वाईन कंपन्यांवर ही मेहरबानी का केली जात आहे असा सवाल केला जात आहे.

दरम्यान 2006 साली राज्य सरकारनं वाईन कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांना फायदा होणार होता. परंतु काही बडया कंपन्यांकडून विदेशातून कच्ची वाईन आयात करुन त्यावर प्रक्रिया केली जात होती. त्यामुळे सरकारनं निर्णयात बदल करुन या कंपन्यांना उत्पादन शुल्क माफीतून वगळलं. परंतु त्यानंतर वगळलेल्या या कंपन्यांनी कर भरला नाही. त्यामुळे 118 कोटींची थकबाकी या कंपन्यांकडे आहे. नाशिकच्या सुलावाईन कंपनीकडे सर्वात जास्त थकबाकी असून ही थकबाकी माफ करण्याचा विचार सध्या सरकारचा सुरु आहे.  त्यामुळे या वाईन कंपन्यांवर सरकार का मेहरबान होत आहे असा सवाल आता केला जात आहे.

COMMENTS