आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार जाहीर!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. एकूण सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून स्नेहा रविंद्र कुऱ्हाडे यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विनोद लक्ष्मण पोखरकर यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच सुहास बागल यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून संदीप पोळ यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संजीव भोर यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून, करण गायकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाने साताय्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले महाराज यांना पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS