निवडणुकीच्या तोंडावर सुशिलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट !

निवडणुकीच्या तोंडावर सुशिलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट !

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रोसचेे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.   आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून अनेकदा ऑफर होती असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र, जीव जाईपर्यंत प्रणिती काँग्रेसमध्येच राहील, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्या रक्तातच काँग्रेस असून, जियेंगे या मरेंगे वो काँग्रेस के साथही, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता   सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS