मनसे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला !

मनसे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला !

मुंबई –  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. देशपांडे यांनी ट्वीट करुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला असून पवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवले नाही ? असा सवाल त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना सवाल केला होता. 2000 मध्ये बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस तुमची आपुलकी कुठे गेली होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला असून 2000 मध्ये पवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवलं नाही असं देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS