माजी क्रिकेटर अझरुद्दीननं घेतली राहुल गांधींची भेट, काँग्रेसमध्ये सक्रीय होणार ?

माजी क्रिकेटर अझरुद्दीननं घेतली राहुल गांधींची भेट, काँग्रेसमध्ये सक्रीय होणार ?

नवी दिल्ली – माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. अझरुद्दीन यांनी त्यांचा मुलगा अब्दुल्लाला सोबत घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राहुल गांधी यांनी अझरुद्दीन यांना पक्षात सक्रीय होण्यास सांगितले होते. त्यानंर अझरुद्दीन यांनी राहुल गांधींची भेट घेतली असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय होणार का याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान  अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये मुरादाबाद येथून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. परंतू २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी घेतली नव्हती. परंतु आता नव्यानेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधी यांनी अझरुद्दीनं यांना पक्षात सक्रीय होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे अझरुद्दीनं आणि राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय होणार का असा सवाल राजयकीय वर्तुळात केला जातोय.

COMMENTS