उद्धव ठाकरेंची आजपासून अयोध्या वारी,  मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी !

उद्धव ठाकरेंची आजपासून अयोध्या वारी, मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. आज विशेष विमानाने ते आपल्या कुटुंबियांसह अयोध्येला जाणार आहेत. राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन काही हिंदुत्ववादी संघटनांसह ते २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौ-यावर मनसेनं बॅनरबाजी केली आहे. अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र खिशात अशी जोरदार टीका मनसेनं शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त पहावयास मिळत आहे. उध्दव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे विशेष विमानाने सकाळी ११ वाजता मुंबईहून अयोध्येकडे रवाना झाले आहेत.

राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. नाशिकहून अयोध्येकडे निघालेली जय श्रीराम एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १० वाजता फैजाबादमध्ये दाखल झाली. तब्बल ३१ तासांचा मोठा प्रवास करुन हे शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. यामध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे.

COMMENTS