मोदी सरकारनं ‘हे’ आश्वासन पाळलं, देशभरातील शेतक-यांना मोठा दिलासा !

मोदी सरकारनं ‘हे’ आश्वासन पाळलं, देशभरातील शेतक-यांना मोठा दिलासा !

नवी दिल्ली – निवडणुकीपूर्वी देलेलं आश्वासन मोदी सरकारने अखेर पाळलं आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देशातील शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला असून पीएम किसान योजनेचा लाभ आता देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये देण्यात येतात. कॅबिनेटने अटी शिथिल केल्यामुळे देशातील 15 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे.

दरम्यान यापूर्वी दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु कॅबिनेटने अटी शिथिल केल्यामुळे देशातील सर्व शेतक-यांना या योजनेचा लाभ होणार आहे. भाजपने या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी पेन्शन आणि शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या अटी शिथिल करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार हे आश्वासन पहिल्याच बैठकीत पूर्ण केलं आहे.

त्याचबरोबर आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता शहीद जवानांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बदलाला मंजुरी देऊन पंतप्रधान म्हणून पहिली सही केली आहे. ही स्कॉलरशिप मुलांसाठी 2 हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. मुलींची स्कॉलरशिप 2 हजार 250 रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितिन गडकरी, राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

COMMENTS