‘या’ योजनेच्या बदलाला मंजुरी देऊन पंतप्रधान मोदींनी केली पहिली सही !

‘या’ योजनेच्या बदलाला मंजुरी देऊन पंतप्रधान मोदींनी केली पहिली सही !

नवी दिल्ली – शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आता मोदी सरकारचं काम जोमाने सुरु झालं आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता शहीद जवानांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बदलाला मंजुरी देऊन पंतप्रधान म्हणून पहिली सही केली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितिन गडकरी, राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

दरम्यान ही स्कॉलरशिप मुलांसाठी 2 हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. मुलींची स्कॉलरशिप 2 हजार 250 रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ही स्कॉलरशिप शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना दिली जाते. याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना असं म्हणतात. याचा फायदा आता शहीद जवानांच्या मुलांना होणार आहे.

COMMENTS