भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंकडून महत्त्वाचे संकेत !

भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंकडून महत्त्वाचे संकेत !

भंडारा   भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीबाबत माजी खासदार नाना पटोले यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. भंडारा गोंदियातील प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद संपलेला आहे. या मतदारसंघात भाजपमुक्त करण्यावर एकमत झाले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे महत्त्वाचे संकेत त्यांनी दिले आहेत. याबाबत पक्षाचे वरिष्ठ येत्या दोन दिवसात निर्णय घेतील आणि जो निर्णय देतील तो दोघांनाही मान्य असेल असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रफुल्ल पटेल माझ्या मोठ्या भावासारखे असून वैचारिक व्यवस्थेमुळे आमचे भांडण होते. आता आम्ही दोघांनीही जनतेचं ऋण फेडायचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आम्ही जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतली असल्याचं दिसत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत.

COMMENTS