साध्वी प्रज्ञांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया !

साध्वी प्रज्ञांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया !

मुंबई – भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कधीच साध्वी प्रज्ञाला मनापासून माफ करु शकणार नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे अत्यंत चुकीचं असून, त्यांना कधीच माफ करु शकणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान नथुराम गोडसे किंवा गांधीजी यांच्यासंबंधी जी वक्तव्यं करण्यात आली आहेत ती चुकीची असून समाजासाठीही वाईट आहेत. ही वक्तव्यं निंदनीय आहेत. असं करणाऱ्यांना यापुढे १०० वेळा विचार करावा लागेल. सभ्य समाजात अशा पद्दतीची भाषा आणि विचारसरणी स्विकारली जाऊ शकत नाही. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं होतं. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं होतं. त्यावर मोदींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS