लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपला धक्का, ‘हा’ पक्ष एनडीएतून बाहेर पडणार !

लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपला धक्का, ‘हा’ पक्ष एनडीएतून बाहेर पडणार !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. नागा पीपल्स फ्रंट हा पक्ष भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंटने केली आहे. भाजप आम्हाला तुच्छ समजत असल्याचा आरोप एनपीएफचे प्रदेशाध्यक्ष अवांगबू नेवमई यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने
मणिपूरमध्ये शनिवारी बैठक बोलावली आहे.
या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत एनपीएफचे चार आमदार आहेत. या चारपैकी एका आमदाराला मंत्रीपद देण्यात आलं आहे. परंतु हा पक्ष गेली काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहे.
2016 मध्ये विविध पक्ष एकत्र येत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने कधीही या युतीच्या मूळ भावनेचा आदर केला नाही. अनेकदा त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना मित्रपक्षाचा सहकारी मानण्यास नकारही दिला, असा आरोप एनपीएफने केला आहे. तसेच एनपीएफने भाजपला नेहमी मोठा भाऊ मानलंय, पण त्यांनी कधीही या भावनेचा आदर केला नाही. आम्हाला योग्य तो सन्मान दिला जात नाही, असा आरोप नेवमई यांनी केला. परंतु भाजपने एनपीएफचे आरोप फेटाळले आहेत.

COMMENTS