नाराज खडसेंना राष्ट्रवादीकडून चुचकारण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी रद्द केली सभा !

नाराज खडसेंना राष्ट्रवादीकडून चुचकारण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी रद्द केली सभा !

जळगाव – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्धार परिवर्तन यात्रा सुरु आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असून जळगाव जिल्ह्यात ही यात्रा पोहचली आहे. यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीनं चुचकारण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे. कारण खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीने जळगाव जिल्ह्य़ातील मुक्ताईनगरमधील सभा शेवटच्या क्षणी रद्द केली आहे.

दरम्यान मुक्ताईनगर हा भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार मुक्ताईनगर इथे आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीची परिवर्तन सभा होणार होती.मात्र शेवटच्या क्षणी कार्यक्रमात बदल करून मुक्ताईनगर ऐवजी जामनेरमध्ये ही सभा घेण्यात येणार आहे. जामनेर हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ त्यामुळे या ठिकाणी सभा घेऊन गिरीश महाजन यांना थेट आव्हान देण्याचं राष्ट्रवादीनं ठरवलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS